Thane News – हातातील स्मार्टफोन पाहून नियत फिरली; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

Thane News – हातातील स्मार्टफोन पाहून नियत फिरली; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस लहान बालकांविरोधात गुन्हेगारी वाढतच आहे. नुकतीच भिवंडीत घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 13 वर्षाच्या मुलाचे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने मुलाकडील स्मार्टफोन आणि 100 रुपये रक्कम चोरून पोबारा केला.

भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर गावाजवळ हर्याचापाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. नितीन वाघे, पद्माकर भोईर आणि अजय मांजे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही भिवंडीतील पडघा गावातील रहिवासी आहेत.

मयत मुलगा शहापूर तालुक्यातील आश्रमशाळेत शिकत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानंतर आईने दुसरा विवाह केला. काही महिन्यांपूर्वीच आईने त्याला स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलगा सध्या रक्षाबंधनासाठी त्याच्या काकाच्या घरी आला होता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला काकाने त्याला बाजारातून राखी आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी 100 रुपये दिले होते.

मुलगा सकाळी 9 च्या सुमारास राखी आणण्यासाठी बाजारात जायला निघाला. मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत मुलगा घरी परतलाच नाही. मुलगा आश्रमशाळेत परत गेला असेल असे वाटून काकाने तेथे फोन करून विचारणा केली असता तो तेथेही परतला नसल्याचे कळले. यानंतर काका शांता वाळवी यांनी पडघा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत मुलगा तीन तरुणांसोबत दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी दुचाकीस्वाराची ओळख पटवत त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिली.

मुलाने आरोपींकडे बाजारापर्यंत लिफ्ट मागितली होती. आरोपींनी त्याला लिफ्ट दिली. मात्र त्याचवेळी मुलाच्या हातातील स्मार्टफोन पाहून आरोपींची नियत फिरली. त्यांनी मुलाचे अपहरण करुन त्याला माळरानात नेले. तेथे गळा आवळून त्याची हत्या केली. मग त्याच्याकडूल स्मार्टफोन आणि 100 रुपये काढून घेतले. त्यानंतर मुलाचा मृतदेह झुडुपात टाकून पलायन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;