अखेर वर्षा उसगांवकर यांनी मान्य केली ‘ती’ मोठी गोष्ट, म्हणाल्या, मी खरोखरच…

अखेर वर्षा उसगांवकर यांनी मान्य केली ‘ती’ मोठी गोष्ट, म्हणाल्या, मी खरोखरच…

अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात त्या धमाकेदार गेम खेळताना देखील दिसत आहेत. वर्षा उसगांवकर  यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेत काम केले. महाभारत मालिकेच्या सेटवरच त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमध्ये त्यांनी मोठा धमाका केला. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात सहभागी होणार नसल्याची चर्चा होती.

वर्षा उसगांवकर यांनी सर्वानाच मोठा धक्का देत थेट बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्या. वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात मोठे खुलासे करताना देखील दिसत आहेत. सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात जोरदार वाद होताना देखील दिसले. सुरूवातीच्या वर्षा उसगांवकर प्रचंड चर्चेत होत्या.

नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला. विशेष म्हणजे त्या टास्कमध्ये धमाकेदार खेळताना वर्षा उसगांवकर दिसल्या. कॅप्टनपद वर्षा उसगांवकर यांना मिळाले आहे. यावेळी वर्षा उसगांवकर यांच्याकडून मान्य करण्यात आले की, सुरूवातीच्या काळात मला गेम कसा खेळायचा हे समजले नाही, मी ही गोष्ट खरोखरच मान्य करते.

वर्षा उसगांवकर यांनी म्हटले की, सुरूवातीच्या काळात मला काही गोष्टी नाही समजल्या. त्यानंतर मी माझ्यामध्ये काही बदल केले आणि मला समजले की, नेमके काय करायचे आहे. मला आता वाटते की, मी कॅप्टनपदासाठी योग्य आहे. यानंतर घरातील काही सदस्यांनी निर्णय घेत, वर्षा उसगांवकर यांना घराचा कॅप्टन केले.

वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घराच्या नव्या कॅप्टन झाल्यानंतर निकी तांबोळी ही डान्स करताना दिसली. यावेळी निकी आणि जान्हवी यांच्यात जोरदार वाद होताना देखील दिसला. निकी तांबोळी हिला जान्हवी हिला कॅप्टन होऊ द्यायचे नव्हते. आता बिग बॉसच्या घराची सर्व समीकरणे ही बदलल्याचे बघायला मिळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;