बॉयफ्रेंडसाठी खराब केले करिअर, प्रेमात मिळाला धोका, अभिनेत्री म्हणाली, पश्चाताप…

बॉयफ्रेंडसाठी खराब केले करिअर, प्रेमात मिळाला धोका, अभिनेत्री म्हणाली, पश्चाताप…

अभिनेत्री अनिता हंसदानी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे अनिता हंसदानी हिचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. अनिता हंसदानी हिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले आहे. अनिता हंसदानी हिने बॉयफ्रेंडसाठी आपल्या करिअरकडे दुर्लक्ष केले. आता त्याच्याबद्दलच बोलताना अभिनेत्री दिसलीये. अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना अनिता हंसदानी दिसलीये.

नुकताच अनिता हंसदानी हिने एक मुलाखत दिली असून तिने मोठे खुलासे केले. अनिता हंसदानी हिला विचारण्यात आले की, एजाज खान याच्यासोबतच्या नात्यावर तिला पश्चापात होतो का?. यावर अनिता हंसदानी म्हणाली की, मी जेंव्हा त्याच्यासोबत रिलेशनमध्ये होते त्यावेळी मी खूप काही गोष्टी नक्कीच शिकले.

मला या गोष्टीचा पश्चाताप नाही की, मी त्याच्यावर प्रेम केले. मला फक्त पश्चाताप या गोष्टीचा आहे की, मी माझ्या करिअरमधील सर्वात महत्वाचा वेळ हा त्या नात्यावर बर्बाद केला. मी एक साऊथचा खूप फेमस चित्रपटही सोडला. फक्त हा विचार करून की, मी जर तो चित्रपट केला तर त्याला वाईट वाटेल. मुळात म्हणजे मला एजाजने कधीच कामासाठी रोखले नाही.

पण मी नेहमीच त्या नात्याचा खूप जास्त विचार करत. माझ्या करिअरचा तो खूप जास्त महत्वाचा वेळ असाच निघून गेला. आता तो वेळ परत येणार नाहीये. त्या गोष्टीचा आजही पश्चाताप मला होतो. पुढे अनिताने हे देखील म्हटले की, जेंव्हा ते नाते तुटले त्यावेळी मी पुर्णपणे तुटले होते…मला त्या नात्यामध्ये धोका मिळाला होता, मला काहीच कळत नव्हते.

अनिताने म्हटले की, जेंव्हा पण मी एखाद्यावर प्रेम केले, त्यावेळी मी त्याच्यासोबत लग्न करण्याचाच विचार केला. पण तसे झाले नाही. पण मला खरोखरच वाटते की, एजाजला चांगला पार्टनर मिळावा आणि त्याने त्याच्या आयुष्यात आनंदी राहावे. आता अनिता हंसदानी हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;