करीना कपूरचं सवतीबद्दल मोठं वक्तव्य, ‘सैफच्या आयुष्यात पहिल्या बायकोचं स्थान कायम…’

करीना कपूरचं सवतीबद्दल मोठं वक्तव्य, ‘सैफच्या आयुष्यात पहिल्या बायकोचं स्थान कायम…’

अभिनेत्री करीना कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. जेव्हा करीनाने अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी करीनाला हे लग्न करु नकोस असा सल्ला दिला. कारण सैफ अली खान विवाहित होता आणि त्याला दोन मुलं देखील होती. पण कोणाचंही न ऐकता करीनाने हिने फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अनेक मुलाखतींमध्ये करीना तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलत असते.

एवढंच नाही तर, अभिनेत्री सवत अमृता सिंग हिच्याबद्दल देखील बोलताना दिसते. ‘घटस्फोटानंतर देखील सैफच्या आयुष्यात अमृताचं महत्त्वाचं स्थान आहे…’ असं करीना म्हणाली होती. ‘मला असं वाटतं अमृताला कायम तिचा सन्मान आणि आदर मिळायला हवा… अशी शिकवण मला माझ्या आई – वडिलांनी दिली आहे. अखेर सैफ – अमृता यांचं लग्न होतं, जे यशस्वी झालं नाही…’

‘अमृतासोबत असलेली मैत्री कायम ठेव… असं मी अनेकदा सैफला सांगितलं आहे. कारण मला असं वाटतं हे योग्य आहे. सैफ याचं पहिलं लग्न झालं आहे आणि त्याला दोन प्रेमळ मुलं आहेत… याचा आदर मी करते. मी अमृताची फार मोठी फॅन आहे. मी तिला कधी भेटली नाही. पण तिचे सिनेमे पाहिले आहे. त्यामुळे सिनेमांमुळे मी तिला ओळखते…’

पुढे करीना म्हणाली, ‘माझ्यासाठी सैफच्या आयुष्यात कायम अमृताचं महत्त्वपूर्ण स्थान राहिल आणि हे मी सैफला सांगितलं देखील आहे. कारण अमृता, सैफची पहिली पत्नी आहे. शिवाय सैफच्या दोन मुलांची आई आहे…’ असं देखील करीना म्हणाली होती.

करीना कपूर खान – सैफ अली खान

करीना कपूर खान – सैफ अली खान यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सैफ याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाने दोन मुलांना जन्म दिला. तैमूर अली खान आणि जेह अली खान… असं करीना – सैफ यांच्या मुलींची नावे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;