बोनस एपिसोडच्या नावाने धोका, डिलिडेट सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना?

बोनस एपिसोडच्या नावाने धोका, डिलिडेट सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना?

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीजनचा बोनस एपिसोड रीलीज झाला आहे. पण त्यामुळे चाहत्यांचा मोठा प्रेक्षकभंग झाला आहे. कारण या एपिसोडमध्ये मुन्ना भैय्या परत येईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण या सीजनमध्ये डिलिटेड सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना लावलाय का अशी विचारणा होते आहे.

मिर्झापूर वेबसीरीजचा तिसरा सीजन या वर्षी रीलीज झाला. अ‍ॅमेझॉन प्राईमवर ही सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरीज ठरली. असे असले तरी प्रेक्षकांचा तिसऱ्या सीजनमुळे अपेक्षाभंग झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. मुन्ना त्रिपाठीच्या अंत्यसंस्कारापासून तिसऱ्या सीजनची सुरुवात होते. ज्या पंकज त्रिपाठीमुळे मिर्झापूर प्रेक्षकांनी उचलून धरला, त्याच पंकज त्रिपाठीचा स्क्रीन टाईम कमी केल्यामुळे चाहते नाराज झाले होते.

त्यात मुन्ना त्रिपाठी नसल्याने प्रेक्षकांचा आणखीन हिरमोड झाला होता. या सगळ्याची भरपाई करावी म्हणून निर्मात्यांनी बोनस एपिसोडचा घाट घातला होता. खुद्द गुड्डू पंडितने याची घोषणा केली होती. ऑगस्ट संपत आला होता तरी हा बोनस एपिसोड रीलीज झाला नाही. म्हणून 30 ऑगस्टला हा एपिसोड प्राईमवर दाखल झाला. त्यापूर्वी या बोनस एपिसोडची जाहिरात खुद्द मुन्ना त्रिपाठीने केली. त्यामुळे या सीजनमध्ये मुन्ना त्रिपाठी परतणार का अशी उत्सुकता होती.

हा एपिसोड स्ट्रीम झाल्यानंतरही अनेकांनी अपेक्षाभंग झाल्याची तक्रार केली. कारण या बोनस एपिसोडच्या नावाने निर्मात्यांनी प्रेक्षकांना डिलीटेड सीन दाखवले. यापूर्वी मिर्झापूरचे डिलीटेड सीन हे युट्युबवर टाकले जायचे. पण आता बोनस एपिसोडच्या नावाने डिलीटेड सीन दाखवल्याने प्रेक्षकांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;