वर्ध्यात भाजप आमदाराच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचे हाल, किचन सेटच्या वाटपावेळी पाण्याचीही सोय नाही

वर्ध्यात भाजप आमदाराच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचे हाल, किचन सेटच्या वाटपावेळी पाण्याचीही सोय नाही

वर्ध्याच्या हिंगणघाट येथील अनुसया मंगल कार्यालयामध्ये कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा कीटचे वाटप होत आहे. यावेळी महिलांनी एकच गर्दी केली आहे कामगार कल्याण विभागामार्फत व्यवस्थित नियोजन करण्यात आले नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय वीस हजारांच्या वर महिला एकत्र जमल्याने एकच झुंबड निर्माण झाली आहे. या महिलांच्या गर्दीत अनेक महिला चक्कर येऊन पडत आहेत. तर सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून हे साहित्य घेण्यासाठी महिला या ठिकाणी जमलेल्या असून, बाहेर असलेल्या महिलांना पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध नाही.

भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी या कार्यक्रमाचे श्रेय घेण्याच्या दृष्टीकोनातून म्हणून जागोजागी बॅनर लावले व किचन वाटप करण्याबाबतचे मेसेजेस देखील पाठविले असल्याच महि बोलत आहेत. या मेसेजेसच्या माध्यमातूनच तालुक्यातून महिलांनी मोठी गर्दी केली मात्र या महिलांच्या व्यवस्था.. सोई बाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. साध्या पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने आपल्या सोबत लहान लहान मुलं घेऊन आलेल्या या लाडक्या बहिणी बेशुद्ध पडत आहेत. याठिकाणी चेंगरा चिंगरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहे.

आता आपली मूल घेऊन, मजुरी सोडून किरायाच्या गाड्या करून आलेल्या या महिला टोकन न घेता परत जाण्यासाठी तयार नाहीत. यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला असून नियोजन शून्यतेमुळे लाडक्या बहिणीचे हाल होत आहे. कामगार कल्याण विभागाचे अधिकारी व आमदार समीर कुणावर हे या जागेवर नाहीत. अनेक महिलांकडून यावेळी दलालांबाबत देखील बोलल्या जात असून दीड दीड हजार रुपये दलाली देऊन आम्ही आमचा नंबर लावून घेतला असे देखील महिलांनी बोलत आहे. पहिलेच नंबर लावा साठी दीड हजार रुपये कमिशन, येण्यासाठी म्हणून केलेल्या दोन दोन हजार रुपयांच्या गाड्या व आपल्या शेतीचे काम तर मोलमजुरी सोडून आलेल्या या लाडक्या बहिणी हिंगणघाट येथील अनुसया मंगल कार्यालयात किट वाटप च्या निमित्ताने होणाऱ्या गैरसोयीने प्रचंड संतापलेल्या आहेत. आक्रमक झालेल्या या महिला आता टोकन घेतल्याशिवाय जाणार नाही अशा बोलत आहे व आयोजकांकडून सर्व महिलांना घरी परत जाण्याचे आवाहन केले जात आहे..

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;