मुख्यमंत्री तुपाशी, ठाण्यातील पीडब्ल्यूडी विभागाचे ठेकेदार उपाशी; कामांची बिले मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन

मुख्यमंत्री तुपाशी, ठाण्यातील पीडब्ल्यूडी विभागाचे ठेकेदार उपाशी; कामांची बिले मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन

ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी आज चक्क सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे. केलेल्या कामाची बिलेच मिळाली नसल्याने ठेकेदारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मिंधे सरकारने गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांचे तब्बल 192 कोटी थकवले असल्याने ठेकेदार शासनाच्या दिरंगाईला वैतागले आहेत. मुख्यमंत्री तुपाशी, ठाण्यातील पीडब्ल्यूडी विभागातील ठेकेदार मात्र उपाशी अशीच काहीशी अवस्था या कंत्राटदारांची झाली आहे.

लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहे. मात्र ठेकेदारांमध्येदेखील काही महिला आहेत. मग त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच सर्वच ठेकेदार शासनाच्या या दिरंगाईला वैतागले असून कुठलेही चालू काम करण्यास ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली आहे. जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत नवीन निविदाही भरणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे. तसेच काही ठिकाणी तातडीची कामे ठेकेदारांकडून करून घेतात, पण त्याला मंजुरी दिली जात नाही अशा दुहेरी संकटात ठेकेदार सापडले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही अन्याय

स्नेहा तावडे, महाराष्ट्र ठेकेदार संघटना सदस्य.मुख्यमंत्री तसेच तसेच सार्वजनिक बांधकाममंत्रीदेखील याच जिल्ह्याचे असतानाही हा अन्याय, दुजाभाव आम्हास सहन करावा लागतोय याचे आश्चर्य वाटते. याआधी अनेक वेळा निवेदन, धरणे आंदोलन, विनंती अर्ज करूनही शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत ठेकेदारांनी केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र ठेकेदार संघटनेने सरकारला दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;