हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; मानखुर्द-वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा रखडली
मानखुर्द-वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 25 ते 30 मिनिटांपासून लोकलसेवा रखडल्याने सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे स्थानकांमध्ये एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्याने अनेक प्रवाशांनी पायी जाण्यात धन्यता मानली.
दरम्यान, ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून लोकल सेवा लवकरात लवकर पूर्वपदावर करण्याचे आव्हान मध्य रेल्वेपुढे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List