शिवप्रेमींच्या संतापाला वाट, उद्या सरकारला जोडे मारा आंदोलन

शिवप्रेमींच्या संतापाला वाट, उद्या सरकारला जोडे मारा आंदोलन

स्थळ – हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया
वेळ – सकाळी 10 वाजता

मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमी जनतेत तीव्र संताप असून शिवद्रोही सरकारविरोधात महाविकास आघाडी रविवारी मुंबईत जोडे मारा आंदोलन करणार आहे. हुतात्मा चौक येथे अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुर्घटनेचा निषेध करून सरकारला जोडे मारण्यात येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे सरकारने घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची प्रचंड लाट उसळली असून शिवद्रोही आणि महाराष्ट्रद्रोह्यांना जोडे मारून महाविकास आघाडी हिसका दाखवणार आहे.

शिवरायांना अभिवादन

हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन केल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे प्रचंड संख्येने आंदोलक पूच करणार आहेत. हातात सरकारच्या निषेधाचे फलक आणि धिक्काराच्या घोषणा देत गेट वे येथे आंदोलक जातील. गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पुतळय़ाला मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येईल. या आंदोलनात जनतेने मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;