दिल्लीसमोर शिवरायांचा महाराष्ट्र झुकणार नाही, काँग्रेसचे जोरदार आंदोलन

दिल्लीसमोर शिवरायांचा महाराष्ट्र झुकणार नाही, काँग्रेसचे जोरदार आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर माफी मागावी लागली. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱया तमाम शिवप्रेमींचा हा विजय आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही व झुकणारही नाही हे आज पुन्हा अधोरेखित झाल्याचा घणाघात करीत आज काँग्रेसने चेंबूरमध्ये जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी संबंधित जबाबदार बडय़ा धेंडांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी  केली.

नसीम खान घरीच स्थानबद्ध

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यासाठी जाणाऱया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरीच स्थानबद्ध करण्यात आले. याप्रकरणी विरोधकांनी मिंधे सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;