दोन दलित मुली मृतावस्थेत आढळल्या; दोन तरुणांवर FIR दाखल

दोन दलित मुली मृतावस्थेत आढळल्या; दोन तरुणांवर FIR दाखल

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन 15 आणि 18 वर्षांच्या दलित मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्या. या प्रकरणी मुलींच्या वडिलांनी 2 मुलांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (कलम 108) गुन्हा दाखल केला आहे. दीपक आणि पवन अशी या दोन तरुणांची नावे आहेत. मात्र सध्या ही दोन्ही तरुण गावातून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

26 ऑगस्ट रोजी फरुखाबादच्या भगवतीपूर गावात गावातील दोन दलित मुली जन्माष्टमीचा उत्सव पाहण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना सापडले होते. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी चौकशी दरम्यान मृत मुलींच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान दोन्ही मुलींच्या घरच्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी एका मुलीच्या वडिलांनी गावातील दोन तरुणांना मुलींच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, मुली फरुखाबादच्या कांपिल पोलीस स्टेशन परिसरात राहणारा दीपक आणि कायमगंजच्या भगवतीपूर गावात राहणारा पवन यांच्याशी खूप दिवसांपासून बोलत होत्या. या मुलांनी अनेकदा त्यांना त्रास दिला असून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला आहे.

अल्पवयीन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी या दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाची पाहणी करत असताना मुलींच्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आढळून आला आहे. तसेच पोलिसांनी मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;