Paris Paralympics 2024 – हिंदुस्थानचा दुहेरी निशाणा! अवनीचा सुवर्णभेद तर, मोना अग्रवालने कांस्य पदकावर उमटवली मोहर

Paris Paralympics 2024 – हिंदुस्थानचा दुहेरी निशाणा! अवनीचा सुवर्णभेद तर, मोना अग्रवालने कांस्य पदकावर उमटवली मोहर

Paris Olympics 2024 मध्ये हिंदुस्थानला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानची तिरंदाज अवनी लेखराने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याचबरोबर तिरंदाज मोना अग्रवालने कांस्य पदकावर मोहर उमटवली असून हिंदुस्थानच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची नोंद झाली आहे.

Tokyo Olympics 2020 मध्ये सुद्धा अवनीने सुवर्ण पदकावर निशाणा साधला होता. तसेच 50 मीटर एअर रायफल थ्री पोझीशन प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. तोच जोश कायम ठेवत 22 वर्षीय अवनीने Paris Paralympics 2024 च्या फायनलमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत 249.7 गुणांची विक्रमी कमाई करत पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर मोहर उमटवली आहे.  त्याचबरोबर अवनी पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावणारी पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली आहे. या प्रकारात हिंदुस्थानच्या मोना अग्रवालने 228.7 गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावाले तर दक्षिण कोरियाच्या ली युनरिने रौप्य पदक पटकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;