रेखा यांनी केला अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाल्या, मी कधी प्रेग्नंट…
बॉलिवूड अभिनेत्री रेखाने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अभिनयासोबतच रेखाचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आमंत्रण नसताना देखील रेखा पोहोचल्या होत्या. सर्वांपासून लपून राहण्यासाठी रेखा यांना काही तास चक्क हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून बसावे लागले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगताना दिसली. हेच नाही तर चक्क चित्रपटाच्या सेटवरच रेखा यांच्या कानाखाली अमिताभ बच्चन यांनी मारली होती. अनेक वर्ष रेखा आणि अमिताभ बच्चन रिलेशनशिपमध्ये होते.
रेखा यांना अमिताभ बच्चन हे भेटण्याच्या अगोदरच त्यांचे लग्न जया बच्चन यांच्यासोबत झाले होते. रेखा यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या अफेअर्सबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले, जे लोकांना माहिती देखील नव्हते. रेखा यांची बायोग्राफी द अनटोल्ड स्टोरी यासिर उस्मान यांनी लिहिले आहे. यामध्ये रेखा यांनी स्वत:बद्दल मोठे विधान केले.
रेखाने बायोग्राफीमध्ये म्हटले की, हा खरोखरच निव्वळ योगायोग म्हणावा लागेल की मी अजून प्रेग्नंट नाही. मी नुसती अभिनेत्री नसून मी बदनाम अभिनेत्री आहे. जिचा भूतकाळ हा अत्यंत वाईट आहे आणि तिची प्रतिमा सेक्स मॅनिक अशी आहे. मुळात म्हणजे रेखा हिचे नाव फक्त अमिताभ बच्चन यांच्यासोबतच नाही तर इतरही अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले.
रेखाने अनेक अभिनेत्यांना डेट केल्याचे बोलले जाते. स्वत:बद्दलच रेखाने असा खुलासा केला. मुळात म्हणजे रेखा यांचे खासगी आयुष्य कधी व्यवस्थित राहिले नाही. रेखा यांनी दिल्लीचे बिझनेसमॅन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले. लग्नानंतर मुकेश अग्रवाल आणि रेखा यांच्यात प्रचंड वाद झाले. सततच्या भांडणांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मुकेश अग्रवाल यांना रेखा यांच्यासोबत विभक्त होणे सहन झाले नाही आणि त्यांनी थेट आपली जीवनयात्राच संपवली. रेखा यांनी त्यानंतर लग्न केले नाही. मात्र, आजही रेखा भांगामध्ये कुंकू लावतात. रेखा या मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातही रेखा या सहभागी झाल्या होत्या. ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे अंबानीच्या लग्नातील फोटो व्हायरल होताना दिसले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List