जैन मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी; तांदुळजा येथील भरदुपारची घटना, दानपेटीतील पंचवीस हजारही लंपास

जैन मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी; तांदुळजा येथील भरदुपारची घटना, दानपेटीतील पंचवीस हजारही लंपास

लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातील दानपेटी व मूर्तीची चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ ते ४ दरम्यान घडली. चोरीच्या घटनेबाबत जैन समाजातील सर्व भाविकांनी व गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रस्टचे सचिव राजेभाऊ अन्नदाते यांनी देवही असुरक्षित असल्याने खंत व्यक्त केली आहे.

तांदुळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून काही अंतरावर मुरुड रोडवर शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरामध्ये दानपेटी व पंचधातूची मूर्ती जी मूर्ती दीड किलो चांदीने मढवलेली होती. चोरट्यांनी ती मूर्ती व दानपेटीतील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये चोरून घेऊन गेले. या प्रकरणी मुरुड पोलीस स्टेशन येथे मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष अमोल देवधारे यांनी चोरी झाल्याचे कळवले घटनास्थळी मुरुड ठाण्याचे पोलीस व असता पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व तांदुळजा बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब जाधवर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दानपेटी मंदिराच्या बाहेर परिसरात टाकून देऊन आत मधील रक्कम घेऊन पोबारा केला. लातूर येथील ठसे तज्ञांच्या पथकास रात्री उशिरा पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तज्ञांनी ठसे घेण्याचे काम करत घटनास्थळाची पाहणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;