मुंबईतून मराठी माणूस होतेय कमी? सोनालीचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली…

मुंबईतून मराठी माणूस होतेय कमी? सोनालीचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सिनेमांध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे देखील कायम चर्चेत असते. शिवाय अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील अभिनेत्री स्वतःचं मत मांडत असते. नुकताच सोनाली हिने मुंबईतील मराठी माणूस आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी सणाचं निमित्त साधत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, ‘आपल्याला कायम वाटतं की मुंबईतून मराठी माणसं कमी होत आहेत का?’ पण सणांच्या दिवशी मराठी माणसांचा उत्साह दिसून येतो. सणांच्या निमित्ताने मराठी माणूस एकत्र येतो. महाराष्ट्राचा मानाचा उत्सव मराठमोळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी जिद्द असते… हे पाहून फार छान वाटतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल देखील सोनाली हिला विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त महाराष्ट्रातच नाही तर, संपूर्ण जगात सारखीच परिस्थिती आहे. घडणाऱ्या घटनांचा प्रचंड राग आहे… देशातील कायदे कठोर होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याच राज्यात क्रांती घडणार नाही. प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात बदल घडायला हवेत…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

‘पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया त्वरित व्हायला हवी आहे. अशा गुन्ह्यांची शिक्षा देखील कठोर असली पाहिजे… जोपर्यंत अशा विषयांकडे गांभीर्याने पाहिलं जाणार नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली कुलकर्णी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोनाली कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘नटरंग’, ‘झिम्मा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘हिरकणी’, ‘क्लासमेट’, ‘पोश्टर गर्ल’, ‘पांडू’, ‘हंपी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहते देखली अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील सोनालीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;