हार्दिक पांड्या बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, क्रिकेटरच्या घटस्फोटानंतर असं काय म्हणाली अभिनेत्री?

हार्दिक पांड्या बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, क्रिकेटरच्या घटस्फोटानंतर असं काय म्हणाली अभिनेत्री?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्य गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. नुकताच, हार्दिक याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांनी दिली. 4 वर्षांच्या संसारानंतर हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिला घटस्फोट दिला आहे. हार्दिक पांड्याने घटस्फोट दिल्यानंतर नताशा देखील मुलासोबत तिच्या मायदेशी गेली. सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर हार्दिक याच्या नावाची चर्चा अभिनेत्री अनन्या पांड्या हिच्यासोबत रंगली. त्यानंतर हार्दिक अभिनेत्री आणि ब्रिटिश सिंगर जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला.

पण आता हार्दिक पांड्या, अनन्या पांडे किंवा जास्मिन वालिया यांच्यामुळे नाही तर, बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने हार्दिकबद्दल मनात असलेल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. हार्दिकवर प्रेम व्यक्त करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री इशिता राज आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत इशिता हिला हार्दिक याच्याबद्दल विचारण्यात आलं.

 

 

在 Instagram 查看这篇帖子

 

Ishita Raj💫 (@iamishitaraj) 分享的帖子

 

हार्दिक बद्दल भावना व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘हार्दित अष्टपैलू क्रिकेटर आहे. फलंदाजी करताना हार्दिकला पाहणं एक उत्साह आहे. मी त्याच्यावर प्रेम करते… खरंच तो माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. हार्दिक पांड्या माझा क्रश आहे आणि मला तो प्रचंड आवडतो…’ असं इशिता राज म्हणाली.

इशिता राज हिचे सिनेमे

अभिनेत्री इशिता राज हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘प्यार का पंचनामा’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘वाईल्ड वाईल्ड’ सिनेमात देखील अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली. सिनेमात इशिता हिच्यासोबत वरुण शर्मा, मनजोत सिंह आणि पत्रलेखा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

हार्दिक पांड्या आणि नताशा

हार्दिक – नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. 2023 मध्ये नताशा – हार्दिक यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;