आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे

आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे

बदलापूर प्रकरणानंतर बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे आता उघड होऊ लागली आहेत. रावेत येथे आईच्या प्रियकराने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने शाळेतील वर्गशिक्षिकेला आपल्यावरील अत्याचाराबाबत माहिती दिल्यानंतर शाळेने पोलिसांच्या दामिनी पथकाला बोलावून हा प्रकार सांगितला. रावेत पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पंकज बाबूराव धोत्रे (वय 45, रा. हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय पीडित मुलीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी याबाबत माहिती दिली. पीडित मुलीचे आई- वडील सहा वर्षांपासून विभक्त राहतात. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ आईसोबत रावेतमध्ये वास्तव्यास आहेत. पीडित मुलगी सहावीच्या वर्गात शिकते. आरोपी पंकज हा एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. तो विवाहित असून, त्यालाही मुले आहेत. तर, पीडित मुलीची आई एका बँकेत नोकरी करते. पीडित मुलीची आई आणि पंकज यांच्यात 2019 पासून प्रेमसंबंध आहेत. पंकज आठवड्यातून चार ते पाच वेळा पीडित मुलीच्या घरी येतो. आई घरी नसताना आरोपी पंकजने वर्षभरापूर्वी मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

आठ ऑगस्ट रोजी पंकजने मुलीबरोबर पुन्हा अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला सोडले. 28 ऑगस्ट रोजी मुलीने शाळेत गेल्यानंतर हा प्रसंग वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यांनी त्वरित प्राचार्यांना याबाबत माहिती दिली. प्राचार्यांनी पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपी पंकज याला बेड्या ठोकल्या. सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.

” बदलापूर प्रकरणानंतर पोलिसांच्या दामिनी पथकामार्फत शहरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना ‘गुड टच’, ‘बॅड टच’ याबाबत माहिती दिली जात आहे. या जनजागृतीमुळेच मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार वर्गशिक्षकेला सांगितला आणि ही घटना समोर आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;