नेवाशातील बेवारस मृतदेहाचा 15 दिवसांनी उलगडा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

नेवाशातील बेवारस मृतदेहाचा 15 दिवसांनी उलगडा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे 15 दिवसांपूर्वी आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणाऱया पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा कापून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला इंदापूर तालुक्यातील लोणी येथून अटक केली.

अंबादास भानुदास म्हस्के (रा. जुना जालना) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी मीना अंबादास म्हस्के, प्रियकर लहू शिवाजी डमरे (वय 31, रा. ढोकसर, ता. बदनापूर) यांना अटक केली आहे.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात शुक्रवार (दि. 16) अनोळखी व्यक्तीचा गळा कापून खून झाल्याची फिर्याद पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी नेवासा पोलिसांत दिली होती. या गुह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती  पटली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीमध्ये घटनास्थळी एक चारचाकी मोटार संशयितरीत्या फिरताना आढळली होती. या मोटारीची माहिती काढली असता, ती मृत अंबादास यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेता त्याचा फोन 15 दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी मीना हिची माहिती मिळविली. ती इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन मीना व तिचा प्रियकर डमरे यास ताब्यात घेतले. डमरेकडे चौकशी केली असता, त्याचे मीनासोबत प्रेमसंबंध असून, त्याने व मीना याने अंबादासचा खून केल्याची कबुली दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;