कोहली वन डेतील ग्रेट फिनिशर, जेम्स अ‍ॅण्डरसनकडून ‘विराट’ कौतुक

कोहली वन डेतील ग्रेट फिनिशर, जेम्स अ‍ॅण्डरसनकडून ‘विराट’ कौतुक

हिंदुस्थानसाठी ‘रन’मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा वन डे क्रिकेटमधील ग्रेट फिनिशर आहे, अशी स्तुतिसुमने क्रिकेटविश्वातील इंग्लंडचा माजी महान वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसनने उधळली आहेत. एकदिवसीय प्रकारामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना आणि तो यशस्वीपणे पूर्ण करताना भरभरून योगदान देण्यात आजपर्यंत विराटपेक्षा चांगला फलंदाज झालेला नाही, असेही तो म्हणाला.

कसोटीमध्ये बळी घेण्याचा निकष लावल्यास जेम्स अ‍ॅण्डरसन हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरतो. निवृत्त होण्यापूर्वी त्याने 188 सामन्यांत 704 कसोटी बळी टिपले आहेत. अ‍ॅण्डरसनव्यतिरिक्त कोणत्याही वेगवान गोलंदाजाला 700 बळींचा टप्पा पार करता आलेला नाही. कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहेत.

मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) हे फिरकीपटू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, मात्र हे दोघेही फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे अ‍ॅण्डरसनसारख्या दिग्गजाने विराटबाबत केलेल्या वक्तव्यावरून जागतिक क्रिकेटमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. टेलेंडर्स पॉडकास्टवर बोलताना अ‍ॅण्डरसन म्हणाला, ‘वन डे क्रिकेटच्या इतिहासात विराटपेक्षा दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणारा आणि धावांचा पाठलाग करणारा दुसरा कोणी फलंदाज माझ्या बघण्यात आलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;