मुंबईत रविवारी सरकारला जोडे मारा आंदोलन, महाविकास आघाडी देणार शिवद्रोह्यांना दणका; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले सहभागी होणार

मुंबईत रविवारी सरकारला जोडे मारा आंदोलन, महाविकास आघाडी देणार शिवद्रोह्यांना दणका; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले सहभागी होणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घोटाळेबाज मिंधे-भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधात शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कमिशनखोर सरकार आता या दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर झटकत आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी रविवार, 1 सप्टेंबर रोजी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत.

मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधकामानंतर अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. सोमवारी हा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकसभा निवडणुकीआधी घाईघाईने तयार करण्यात आलेल्या या पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मिंधे मुख्यमंत्र्यांसह  दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील बडे नेते उपस्थित होते.  मात्र बांधकामानंतर अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारच्या बेजबाबदारपणाची पोलखोल झाल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार आहे.

निषेधाचे फलक, धिक्काराच्या घोषणा

1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हुतात्मा स्मारकास वंदन करून गेट वे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळय़ाकडे जाणार आहेत.  गेल्या अनेक वर्षांपासून तिथे शिवरायांचा पुतळा दिमाखाने उभा आहे. या ठिकाणी निर्ढावलेल्या, घोटाळेबाज आणि कमिशनखोर सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलकांच्या हाती सरकारच्या निषेधाच्या घोषणेचे फलक तर मुखामध्ये शिवरायांचा जयजयकार आणि सरकारच्या धिक्काराच्या घोषणा असतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;