नगरमधील ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला

नगरमधील ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला

नगरमधील नेवासे तालुक्यात 15 दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यास आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

अंबादास भानुदास म्हस्के असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मीना अंबादास म्हस्के आणि लहू शिवाजी डमरे अशी आरोपींची नावे आहेत. पाचेगाव शिवारात 16 ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न पटल्याने मृत व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मृताचा फोटो राज्यभरातील पोलीस ठाणे आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले.

सीसीटीव्हीमध्ये घटनास्थळाच्या परिसरात एक चारचाकी कार संशयितरित्या फिरताना आढळून आली. या कारची माहिती घेतली असता ही कार मृत अंबादासच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कार मालक अंबादासशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन 15-20 दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी मीनाची माहिती मिळवली. यावेळी मीना ही इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी इंदापूर गाठत मीना आणि तिचा प्रियकर डमरे यास ताब्यात घेतले. यावेळी डमरेकडे चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;