पैशासाठी अजगर पकडून आणला, पण अजगराने गळाच घोटला

पैशासाठी अजगर पकडून आणला, पण अजगराने गळाच घोटला

आजकाल झटपट पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पण कधी कधी पैसे कमवण्याचा हाच शॉर्टकट आयुष्याचा शॉर्टकट ठरतो. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पैसे कमावण्यासाठी गळ्यात साप, अजगर अडकवणाऱ्या इसमाचा गळ्यातील अजगराने घात केला. अजगराने गळ्याभोवती वेटोळा घातल्याने गुदमरून 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हेमंत सिंग असे मयत इसमाचे नाव आहे. झारखंडमधील जमशेदपूर शहरातील मँगो परिसरात डिमना रोडवर ही घटना घडली. सिंगचा मृत्यू झाल्यानंतर अजगर परिसरात फिरत होता. मात्र सर्पमित्रांनी तात्काळ धाव घेत अजगराला पकडून वनविभागाकडे सुपूर्द केल्याचे आंबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निरंजन कुमार यांनी सांगितले.

याप्रकरणी आंबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आंबा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हेमंतच्या या कृत्याचा झारखंडमधील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटीने समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर हेमंतचा पोस्ट करत त्यांनी सबक असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;