गेल्या दहा वर्षात महिला अत्याचारांच्या घटना वाढ, पंकजा मुंडे यांनी ठेवले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर बोट

गेल्या दहा वर्षात महिला अत्याचारांच्या घटना वाढ, पंकजा मुंडे यांनी ठेवले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर बोट

निर्भया ते बदलापूर हा घटनाक्रम पाहता गेल्या दहा वर्षामध्ये महिला अत्याचारांच्या घटनात मोठी वाढ झाली असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

आमदार मुंडे या बुधवारी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बदलापूर अत्याचार घटनेबाबत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना आरोपीला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी केली.

अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत अशी चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या गेल्या दशकात यात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट करीत त्यांनी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर अप्रत्यक्ष बोट ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील स्मारकाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, शिवाजी महाराजांचा पुतळा कसा काय पडला याबाबत विचारणा केली असता, पुतळा कसा पडला याबाबत संबंधित मंत्री, अधिकारी आणि ज्यांनी पुतळा उभा करण्याचे काम केले, त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी अधिक बोलण्याची गरज नाही. लवकरच नवीन पुतळा बसवण्यात येईलव, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे याही सोबत होत्या. श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आमदार मुंडे यांचा सत्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;