Badlapur Sexual Assault – नराधम अक्षय शिंदे विरोधात दोन स्वतंत्र FIR, कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

Badlapur Sexual Assault – नराधम अक्षय शिंदे विरोधात दोन स्वतंत्र FIR, कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. नराधम अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर केलेल्या अत्याचारानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण दोन्ही गुन्ह्यांबद्दल एकच एफआयआर करण्यात आला होता. त्यामुळे आता दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार दुसऱ्या चिमुकलीवरील अत्याचाराचा स्वतंत्र गुन्हा गुरुवारी नराधम अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरमधील एका शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. मुलींच्या पालकांनी तक्रार करूनही 11 तासानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर   नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. यावेळी विविध संस्थांनी बंदची हाक दिली होती. आता या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर अत्याचाराचे स्वतंत्र गुन्हा गुरुवारी अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;