सलमान खान याच्या घरातील ‘हा’ सदस्य चक्क उभे राहूनच झोपतो, मोठा खुलासा, कोणाचीही हिंमत…

सलमान खान याच्या घरातील ‘हा’ सदस्य चक्क उभे राहूनच झोपतो, मोठा खुलासा, कोणाचीही हिंमत…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सलमान खान सोशल मीडियावरही सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सलमान खान दिसला. सलमान खान हा फक्त त्याच्या अभिनयामुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपींना अटक केली.

हेच नाही तर आता सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. सलीम खान यांनी त्यांच्या घरातील एका सदस्याबद्दल मोठा खुलासा केला. सलमान खानचे वडील सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला.

सलीम खान म्हणाले की, सलमा हिने हुंड्यामध्ये गंगारामला आणले आहे. विशेष म्हणजे घरातील कोणीही व्यक्ती गंगारामला रागू शकल नाही. सर्वजण गंगारामला मामा बोलतात. एकदा मी गंगारामला थोडासा ओरडलो होतो तर माझी पत्नी सलमा ही मला चक्क सहा महिने अजिबात बोलली नव्हती. यावर कपिल याने विचारले की, तो कुठलचा आहे?.

सलीम खान म्हणाले की, ते मला ही माहिती नाहीये…तो सलमा हिच्यासोबत लग्नात आला आणि तो गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. पुढे सलीम खान म्हणाले की, तो कधीही आणि कुठेही झोपतो. फक्त त्याला डोके टेकवण्यासाठी एखादी भिंत मिळाली तरीही तो उभे राहूनच झोपू शकतो. अरबाज म्हणाला की, तो काहीही बोलू शकतो. 

एकदा मी घरी फोन केला आहे म्हटले की, डॅडी कुठे आहेत? तर गंगाराम मला म्हणतो की, कोण डॅडी? मी परत म्हटले की, डॅडी…तर तो मला म्हणतो की, तुझा बाप झोपला आहे. अरबाज म्हणाला की, तो कोणालाही काहीही बोलू शकतो. विशेष म्हणजे यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये गंगाराम हा देखील पोहोचला होता. कपिल शर्माने गंगारामला स्टेजवर बोलावले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;