सलमान खान याच्या बॉडीगार्डने खरेदी केली तब्बल इतक्या कोटीची आलिशान कार, शेराने…

सलमान खान याच्या बॉडीगार्डने खरेदी केली तब्बल इतक्या कोटीची आलिशान कार, शेराने…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडचा दबंग खान देखील म्हटले जाते. सलमान खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींना आणि अभिनेत्यांना  बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. सलमान खान याचा अभिनयच नाही तर त्याचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे. ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि इतरही बऱ्याच अभिनेत्रींना सलमान खानने डेट केलंय. ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरची चर्चा सर्वाधिक रंगली. हेच नाही तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. फक्त धमक्याच नाही तर सलमान खानच्या मुंबईतील घरावर काही दिवसांपूर्वीच गोळीबार करण्यात आला. गुजरातमधून आरोपींना पोलिसांनी अटक केले. एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोईने थेट म्हटले होते की, माझे स्वप्न सलमान खानला मारून टाकणे आहे. 

सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही त्याचा बॉडीगार्ड असलेल्या शेरावर आहे. 24 तास शेरा हा सलमान खानच्या सुरक्षेसाठी तयार असतो. हेच नाही तर पार्टी असो किंवा एखादे शूटिंग त्यावेळीही शेरा सलमानच्या आसपास दिसतो.

विशेष म्हणजे शेरा जरी सलमान खान याचा बॉडीगार्ड असला तरीही तो खास लाईफ जगतो. नुकताच आता शेराने अत्यंत लग्झरी गाडी खरेदी केलीये. शेराने ब्लॅक रंगाची रेंज रोवर ही गाडी खरेदी केलीये. शेराने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत तब्बल 1.4 कोटी आहे. या गाडीसोबतचा खास फोटोही त्याने शेअर केलाय.

शेराने गाडीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, देवाच्या आर्शिवादाने आमच्या घरी एका नवीन मेंबरचे स्वागत आहे. लोक आता शेराच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करून शेराला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शेराची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;