Video मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी, पोलिसाला स्वत:ची गाडी धुवायला लावली

Video मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी, पोलिसाला स्वत:ची गाडी धुवायला लावली

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य नाहीतर कृत्यांमुळे चर्चेत असतात. या महिनाभरात ते तलवारीने केक कापणं, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य यामुळे वादात राहिले आहेत. दरम्यान आता त्यांच्यासंदर्भातला आणखी एक व्हिडीओ समोर आला असून त्यात गायकवाड यांची गाडी चक्क त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी धूत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून तो व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत गायकवाड यांना धूधू धुतले आहे.

बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानंतर गायकवाड यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला आमदार महाशयांनी चक्क त्यांची गाडी धुवायला लावल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

”कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र पोलीस शर्म करो !सद्रक्षणाय , खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? दोन दिवसांपूर्वी आमदारांनी मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एसपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? असे असंवेदनशील वक्तव्य केले होते. आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले = पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना.पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा”, असे सपकाळ यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;