कुटुंबियांच्या विरोधात मुस्लीम पुरुषाशी लग्न, आजही प्रसिद्ध गायिकेला होतोय पश्चाताप

कुटुंबियांच्या विरोधात मुस्लीम पुरुषाशी लग्न, आजही प्रसिद्ध गायिकेला होतोय पश्चाताप

झगमगत्या विश्वात अशा अनेक महिला सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जात संसार थाटला. लग्नानंतर काही महिला सेलिब्रिटी आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. तर काहींच्या वाट्याला मात्र दुःख आलं. ज्यामुळे कुटुंबियांच्या विरोधात जावून लग्न केल्याचा पश्चातापाचा सामना करावा लागला. अशाच महिला सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान… आज सुनिधी चौहान हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण गायिकेने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे.

सुनिधी चौहान हिने 1996 मध्ये ‘दूरदर्शन’वरील ‘मेरी आवाज सुनो’ या सिंगिंग शोमधून करियरची सुरुवात केली. सुनिधीने शोच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव देखील कोरलं. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी सुनिधी हिने करियरची सुरुवात केली. गायिकेला पहिला ब्रेक 1999 साली प्रदर्शित झालेल्या ‘मस्त’ सिनेमातील ‘रुकी रुकी सी जिंदगी’ या गाण्यातून मिळाला.

बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर सुनिधीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. गायिकेने एकापेक्षा एक गाणी गायली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. सुनिधीला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण खासगी आयुष्यात सुनिघीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला…

वयाच्या 18 व्या वर्षी सुनिधी चौहान हिने कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक बॉबी खान याच्यासोबत लग्न केलं. रिपोर्टनुसार, बॉबी खान आणि सुनिधी चैहान यांच्या लग्नाचा गायिकेच्या कुटुंबियांकडून विरोध होता. पण सुनिधीने कुटुंबियांच्या विरोधात जावून 2002 मध्ये बॉबी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील सुनिधीच्या कुटुंबियांनी तिची स्वीकार केला नाही. तर सासरच्या मंडळींसोबत देखील सुनिधीचे वाद होण्यास सुरुवात झाली.

लग्नानंतर सुनिधी आणि बॉबी यांच्यामध्ये सतत वाद होऊ लागले. अशात बॉबीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. बॉबी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सुनिधी हिने 2012 मध्ये खास मित्र हितेश सोनिक याच्यासोबत लग्न केलं. सुनिधी आणि हितेश यांना एक मुलगा देखील आहे. आता सुनिधी दुसरा पती आणि मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

सुनिधी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांसाठी सुनिधी हिने आवाज दिला आहे. सोशल मीडियावर देखील सुनिधी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुनिधी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;