जब एक प्रतिमा ढहती है तो..; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी स्वानंद किरकिरेंची मार्मिक पोस्ट

जब एक प्रतिमा ढहती है तो..; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी स्वानंद किरकिरेंची मार्मिक पोस्ट

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. इतकंच नव्हे तर पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण रंगात आलं असून बुधवारी किल्ल्यावर त्याचे प्रतिबिंब उमटले. या घटनेवरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार, गायक आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

स्वानंद किरकिरे यांची पोस्ट-

‘जब एक प्रतिमा ढहती है, तो कई और प्रतिमाएँ ढह जाती हैं.. लोगों के दिलों में,’ (जेव्हा एखादी प्रतिमा ढासळते, तेव्हा लोकांच्या मनात इतरही अनेकांच्या प्रतिमा ढासळतात) असं त्यांनी लिहिलंय.

नौदल दिनानिमित्त गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं, असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे बुधवारी राजकोट किल्ल्यावर एकाच वेळी पोहोचले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि दगडफेक झाली. यात दोन महिला पोलीस आणि काही कार्यकर्ते जखमी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दु:खद आहे. नौदल याबाबत चौकशी करत असून त्या घटनेवरून राजकारण करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. “नौदलाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. ते चौकशी करून उचित कारवाई करतील. प्रत्येक गोष्टीतून राजकारण शोधून काढायचं. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचं हे चुकीचं आहे”, असंही ते म्हणाले. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून रविवारी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. मालवणमधील हाणामारीच्या घटनेनंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;