महिलांबद्दल चुकीचे भाष्य करणाऱ्याला थेट अमिताभ बच्चन यांनी फटकारले, बिग बी म्हणाले, महिला कायमच…
अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. या नव्या सीजनमध्ये निर्मात्यांकडून काही मोठे बदल देखील करण्यात आले आहेत. बिग बी सोशल मीडियावरही सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी ते खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काैन बनेगा करोडपतीच्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले होते. काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर एका स्पर्धकाला अमिताभ बच्चन हे थेट म्हणाले की, नेहमी पत्नी बरोबर असते हे कायमच लक्षात ठेव.
आता अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. कृष्णा सेलूकर हा काैन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर पोहोचला. यावेळी कृष्णा सेलूकर हा आपला अनुभव सांगताना दिसला. मात्र, यावेळी त्याने घरी राहणाऱ्या लग्न न झालेल्या मुलींबद्दल अत्यंत हैराण करणारे विधान केले. त्यानंतर अमिताभ बच्चन हे त्याला फटकारताना दिसले आहेत.
कृष्णा सेलूकर म्हणाला की, कोरोनाच्या काळात माझी नोकरी गेली. इंजिनिअर असूनही मला घरी बसावे लागले. कृष्णा म्हणाला, सर तुम्हाला सांगतो की, ज्यावेळी लग्न न झालेली मुलगी घरच्यांसाठी ओझे असते…तसेच नोकरी नसलेला तरूणही त्याच्या घरच्यांसाठी ओझे बनतो. कृष्णा याला थांबवत अमिताभ बच्चन यांनी मोठे भाष्य केले.
अमिताभ बच्चन हे म्हणाले की, महिला या कधीच ओझे होत नाहीत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, मुलगी कधीच ओझे होत नाही. खूप मोठी शान महिला असतात, असेही यावेळी त्यांनी म्हटले. आता अमिताभ बच्चन यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनेकांनी म्हटले की, अमिताभ बच्चन जे बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे.
अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपती हे 2000 पासून होस्ट करत आहेत. या सीजनच्या पहिल्या एपिसोडवेळी अमिताभ बच्चन हे खूप जास्त भावूक होताना दिसले. हेच नाही तर त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. नेहमीच अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर त्यांचे काही अनुभव शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List