कंगना राणावत हिने उडवली खिल्ली, थेट म्हणाली, घटस्फोट कशाला मग…

कंगना राणावत हिने उडवली खिल्ली, थेट म्हणाली, घटस्फोट कशाला मग…

अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभेची निवडणूक लढवली आहे आणि आता ती खासदार झालीये. कंगना राणावत ही सोशल मीडिया चांगलीच सक्रिय असते. सध्या कंगना ही तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसत आहे. लाफ्टर शेफमध्येही कंगना राणावत ही पोहोचली होती. कंगना राणावत हिच्या इमर्जन्सी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ बघायला मिळतंय. हेच नाही तर हा चित्रपट धमाका करेल, असेही सांगितले जातंय.

एका मुलाखतीमध्ये कंगना राणावत ही परत एकदा बॉलिवूडवर टीका करताना दिसली. यावेळी सर्वात होपलेस जागा ही चित्रपट क्षेत्र असल्याचेही तिने म्हटले. नुकताच आता कंगना राणावत हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे परत एकदा कंगना चर्चेत आलीये. यावेळी तिने एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याची खिल्ली उडवल्याचे सांगितले जातंय.

मुलाखतीवेळी कंगना राणावत हिला विचारण्यात आले की, तू तुझ्या कोणत्या एक्सच्या संपर्कात असते का? यावर कंगना राणावत हिने थेट म्हटले की, मी कधीच माझ्या कोणत्या एक्सच्या संपर्कात राहिले नाहीये. मी नक्कीच त्या लोकांपैकी एक नाही की, घटस्फोटानंतरही आपल्या एक्सला सोना बेबी बोलतात.

जर तुम्हाला हेच बोलायचे आहे तर मग घटस्फोट किंवा ब्रेकअप कशाला करतात…एकत्र राहा मग…कंगना राणावत हिने हा निशाना आमिर खान याच्यावरच साधल्याचे सांगितले जाते. कारण काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिर खान याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही एक्स पत्नींसोबत तो संपर्कात असतो. हेच नाही तर किरण राव आणि आमिर खान एकाच इमारतीमध्ये राहतात.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव हिने म्हटले होते की, माझा आणि आमिरचा घटस्फोट झाला असला तरीही आम्ही दोघे एकाच इमारतीमध्ये राहतो आणि आमचे जेवणही एकत्रच तयार होते. किरण राव हिच्या या विधानानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. मात्र, आता कंगना राणावत हिच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, ती कधीच तिच्या एक्सच्या संपर्कात अजिबात नसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;