एसएमई आयपीओत गुंतवणूक करताना सावध रहा, ‘पंप अँड डंप’वरून सेबीचा गुंतवणूकदारांना सल्ला

एसएमई आयपीओत गुंतवणूक करताना सावध रहा, ‘पंप अँड डंप’वरून सेबीचा गुंतवणूकदारांना सल्ला

शेअर बाजारामध्ये सध्या चांगली तेजी पहायला मिळत आहे. त्यामुळे याचा फायदा उठवत आयपीओद्वारे पैसे जमवण्यासाठी कंपन्यांची रीघ लागलेली आहे. आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक चांगला नफा कमावण्याच्या उद्देशाने तुम्ही बाळगून असाल तर थोडं थांबा. कारण सेबीने छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या (एसएमई) आयपीओमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

एसएमई कंपन्या बनावत प्रतिमा तयार करून शेअर किंमतींमध्ये फेरफार करतात. त्यानंतर शेअरच्या किंमती वाढल्यावर आपला नफा काढून घेतात. यालाच शेअर बाजारातील भाषेमध्ये ‘पंप अँड डंप’  म्हणतात. एसएमई कंपन्यांकडून असा फेरफार वाढत असल्याच्या वृत्ताचा हवाला देत सेबीने गुंतवणूकदारांना हुशारीने पैशाची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडिया पोस्ट, टीप्स आणि अफवांच्या आधारे गुंतवणूक करू नये, असे सेबीने म्हटले आहे. शेअर बाजारात आयपीओ लिस्ट झाल्यानंतर एसएमई कंपन्या किंवा त्यांचे प्रवर्तक जाहीररित्या अशी विधाने करतात ज्यामुळे सकारात्मक चित्र निर्माण होते. यामुळे गुंतवणूकदार असे शेअर घेण्यास प्रवृत्त होतात. एकदा की शेअर वाढला की कंपनी तो उच्च किंमतीत विकून चांगला नफा कमावते. अशा वेळी सामान्य गुंतवणूकदार यात अडकून पडतात. त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सेबीने केले.

2012 मध्ये उद्योन्मुख व्यवसायांना निधी उभारण्यास सक्षम करण्यासाठी प्लॅटफॉर्म देण्यात आला. त्यानंतर एसएमई आयपीओंची संख्या वाढली. गेल्या 12 वर्षात या फ्लॅटफॉर्मचा वापर करून 14 हजार कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. यापैकी 6 हजार कोटी रुपये फक्त 2023-23 या वर्षात उभारण्यात आले आहेत.

सेबीने याच आठवड्याच्या सुरुवातीला डेबॉक इंटस्ट्रीज नावाच्या एसएमई संस्था आणि प्रवर्तकांसह तीन संस्थांविरुद्ध आदेश पारित केला. ही कंपनी जून 2018 मध्ये एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाली होती आणि मार्च 2022 मध्ये मुख्य मंडळाकडे स्थलांतरित झाली. प्रवर्तकांनी व्यवसायात आणि महसुलात मोठी वाढ दाखवण्यासाठी फेरफार केला. सेबीने चौकशी करेपर्यंत प्रवर्तकांनी एकून 89.2 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा कमावला, तर शेअरधारकांकडे मात्र निरुपयोगी शेअर शिल्लक राहिले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;