आई होताच कोट्यवधींच्या घरात शिफ्ट होणार दीपिका; बाळासह करणार गृहप्रवेश?
अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती.
आई झाल्यानंतर दीपिका तिच्या पती आणि बाळासह नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका आणि रणवीर सिंह हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याच्या शेजारीच आहे.
'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहने त्याचे वडील जगजीत सिंह भवनानी यांच्या कंपनीसोबत मिळून एक आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलंय. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 110 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. किंग खानच्या 'मन्नत' जवळच हे अपार्टमेंट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List