या प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली ‘अनुपमा’ मालिका; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

या प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली ‘अनुपमा’ मालिका; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

‘अनुपमा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने आतापर्यंत टीआरपीचे सर्व विक्रम मोडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या कथानकात लीप येणार असल्याची चर्चा होती. या लीपनंतर अनुपमाची मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली आणि अनुजची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्ना मालिकेत दिसणार नाही, असंही म्हटलं जात होतं. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याने या मालिकेला रामराम केला आहे. ‘अनुपमा’मध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं ही मालिका सोडली आहे. खुद्द सुधांशूने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुधांशूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलही घोषणा केली आहे. त्यात तो म्हणतोय, “तुम्हा सर्वांना माहितच आहे की मी गेल्या चार वर्षांपासून अनुपमा या मालिकेशी जोडला गेलोय. या भूमिकेमुळे मला खूप सारं प्रेम आणि तेवढीत प्रेक्षकांची नाराजीसुद्धा मिळाली. पण ती नाराजी माझ्यासाठी प्रेमच आहे. कारण जर तुम्ही माझ्यावर नाराज झाले नसता, तर मी माझं काम योग्य करतोय असं वाटलंच नसतं. आज मीा तुम्हाला जड अंत:करणाने हे सांगू इच्छितो की मी यापुढे अनुपमा या मालिकेत दिसणार नाही. रक्षाबंधनपासूनच मी ही मालिका सोडली आहे. इतके दिवस झाले आणि माझ्या प्रेक्षकांना असं वाटू नये की मी न सांगताच निघून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. आता मी या मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारताना दिसणार नाही. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि माफ करा कारण मला अचानक हा निर्णय घ्यावा लागला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudhanshu Pandey (@sudanshu_pandey)

सुधांशूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या एक्झिटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘वनराज शाहची भूमिका तुझ्याशिवाय दुसरं कोणी उत्तम साकारूच शकत नाही. तुम्ही खूप चांगले अभिनेते आहात’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आधी समर, नंतर पाखी आणि आता वनराज.. मालिकेतून सगळे चांगले कलाकार बाहेर पडतायत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता ही मालिका मी बघू शकत नाही’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;