बंगाल बंददरम्यान हिंसाचार, भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार; भाजपा राज्याची बदनामी करत असल्याचा ममता यांचा आरोप

बंगाल बंददरम्यान हिंसाचार, भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार; भाजपा राज्याची बदनामी करत असल्याचा ममता यांचा आरोप

कोलकात्यात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने आज 12 तासांच्या ‘बंगाल बंद’ची हाक दिली होती, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करणाऱ्या भाजपच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. बंददरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर 24 परगणा जिह्यात भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार झाला. तसेच बॉम्ब फेकण्यात आले. यात चालकासह दोघांना गोळ्या लागल्या असून एक गंभीर आहे. दरम्यान, भाजप बंद करून राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

आरोपीला फक्त फाशी; शिक्षेसाठी विधेयक आणणार – ममता बॅनर्जी

पुढच्या आठवड्यात  विधानसभेचे अधिवेशन बोलावू आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी 10 दिवसांत विधेयक मंजूर करू आणि ते राज्यपालांकडे पाठवू. त्यांनी ते मंजूर न केल्यास आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करू. राज्यपाल जबाबदारीतून सुटू शकत नाहीत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बस! आता खूप झाले मी निराश आणि भयभीत – राष्ट्रपती मुर्मू

कोलकात्यातील घटनेनंतर देशभरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने एनडीए सरकारच्या पोकळ धोरणांविरोधात प्रचंड संताप व्यक्त होतोय. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. बस आता खूप झाले, कोलकाता घटना प्रचंड वेदनादायी आणि भयावह असून मी प्रचंड निराश आणि भयभीत झाले आहे. महिलांविरोधातील या विकृतींविरोधात देशाने जागे होण्याची वेळ आली आहे, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;