‘मुझे माफ करना राहुल मेरे भाई…’, भाजप नेत्यांचा अनोख्या पद्धतीने काँग्रेसमध्ये प्रवेश

‘मुझे माफ करना राहुल मेरे भाई…’, भाजप नेत्यांचा अनोख्या पद्धतीने काँग्रेसमध्ये प्रवेश

निवडणूक आयोगाने हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर तेथील राजकीय वातावरण तापत आहे. तसेच पक्षांतराच्या घटनाही वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर हरियाणा सरकारच्या स्पेशल पब्लिसिटी सेलचे माजी अध्यक्ष आणि हरियाणवी गायक जय भगवान मित्तल उर्फ ​​रॉकी मित्तल यांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रॉकी मित्तल यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. या पक्ष प्रवेशावेळी गायक रॉकी मित्तल यांनी राहुल गांधी यांच्यासाठी खास गाणे गायले. रॉकी मित्तल यांनी राहुल गांधींची माफी मागून पक्षात प्रवेश केला. त्यांनी मंचावर राहुल यांना उद्देशून गाणे गायले. या अनोख्या शैलीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मुझे माफ करना राहुल मेरे भाई…भाजप नेते रॉकी मित्तल यांनी माफी मागत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”

रॉकी मित्तल यांनी 1 ऑगस्ट रोजी भाजपला रामराम ठेकला होता. पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मित्तल यांनी भाजपवर केला. मित्तल म्हणाले की, गेल्या 14 वर्षांत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 200 हून अधिक गाणी लिहिली आणि गायली. असे असूनही आपल्याला तुरुंगात टाकण्यात आले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.आपण काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात गाणी बनवली, पण त्यांनी माझ्याविरोधात कधीही तक्रार केली नाही. आता मला वाटते की, मी काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात गाणी बनवून खूप मोठी चूक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;