Nagar News – सातवा वेतन आयोग लागू करा, मनपा कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

Nagar News – सातवा वेतन आयोग लागू करा, मनपा कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित आहे. तो राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले. मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून आज तिसऱ्या दिवशी मनपा कर्मचाऱ्यांनी चारही प्रभाग कार्यालय बंद ठेवून उस्फूर्तपणे उपोषणाला पाठिंबा दिला. यामुळे मनपात शुकशुकाट पहायला मिळाला.

यावेळी कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी आपल्या भावना व्यक्त करताना महापालिका प्रशासन व सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम प्रशासनाचे होते, मात्र त्यांनी त्यासाठी कुठल्याही उपयोजना केल्या नाही, याचबरोबर आस्थापना खर्च जास्त असल्याचे कारण देत सरकार वेळ काढूपणा करत आहे. कर्मचारी उपाशी ठेवायचे आणि तुम्ही तूपाशी राहायचे हा कुठला न्याय? कर्मचाऱ्यांनी आता एकीची ताकद दाखवली आहे. त्यामुळे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतो, मात्र त्याचा कष्टाला फळ मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच जो पर्यंत राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्बेत खालावत चालली आहे.

नगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, गणेश लयचेट्टी, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, किशोर कानडे, भीमराज कानगुडे, सतीश बनकर, हेमा साळवे, येमूल, देशमुख, कुलकर्णी, जोशी, अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर, तसेच सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल लोंढे, अजित तारू, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अकील सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दिपक मोहिते, नागनाथ पवले, वसंत थोरात, अनवर शेख, सुनील चाफे, मेहेर लहारे, वैभव जोशी, परीक्षित बिडकर, राजू लयचेट्टी तसेच महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;