समृद्धी महामार्गावर पुन्हा मोठ्याला भेगा; एमएसआरडीसीचा दावा फोल
छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजनजीक 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यास 20 वर्षे रस्त्यावर खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता. मात्र, या महामार्गाला भेगा पडल्याने एमएसआरडीसीचा दावा फोल ठरला आहे. 444.4 ते 444.6 या दोन चॅनल नंबरमध्ये माळीवाडा इंटरचेंजवळी पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसीचे अधिकारी मात्र या बाबत बोलण्यास तयार नाही. सिमेंट रस्त्यावर आडव्या भेगा लवकर दुरुस्त होतात. पण उभ्या भेगा कायमस्वरुपी दुरूस्त करणे अवघड असते. रस्ता करताना भरावाची दबाई व्यवस्थित न झाल्याने व रस्ता झाल्यावर क्युरिंग न केल्यामुळे अशा भेंगा पडतात किंवा तेवढा पॅच निकृष्ट दर्जाचा असल्याने भेगा पडतात.
या सर्व महामार्गाच्या कामांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला होण्याआधीच सर्व प्रथम समृद्धी महामार्ग सुरू झालेल्या माळीवाडा इंटरचेजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वाहनचालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी या भेगा व खड्डे एमएसआरडीसीने बुजवून टाकले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List