प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग, राजकीय नेत्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा 

प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग, राजकीय नेत्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा 

जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचयातमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी एक 38 वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवासव्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत करण्यात आलेली आहे. काल सदर महिला अधिकारी आपल्या खोलीत थांबलेल्या असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन इसम त्यांच्या खोलीत घुसले. त्यापैकी एकाने मी भाऊसाहेब गोरे असून, मी डीपीटीसी मेम्बर आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. त्यावेळी सदर महिला अधिकाऱ्याने मला तुमच्या सहकार्याची गरज नाही, असे म्हणत खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले.

तरीही त्या दोघांनी खोलीतून बाहेर न जाता खोलीतच थांबून सदर महिला अधिकाऱ्यांच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून, विनयभंग केला. हे दोघे तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांना धमक्या देत अर्वाच्य भाषा वापरली. याप्रकरणामुळे भयभीत झालेल्या या महिला अधिकाऱ्याने काल रात्री तातडीने जालना येथे येऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची भेट घेऊन, आपबित्ती सांगितली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा नोंदविण्याची सूचना केली. त्यानुसार काल रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात सदर महिला अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाऊसाहेब गोरे व त्याचा एक साथीदार अशा दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 74, 329 (1), 3 (5) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पुढील तपासासाठी मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती हे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;