अमिताभ बच्चन यांचे पत्नीबद्दल अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठे चढउतार देखील बघितले आहेत. एक काळ त्यांच्या आयुष्यामध्ये असा आला होता की, त्यांच्यासोबत कोणतीही अभिनेत्री चित्रपट करण्यास तयार नव्हती. मात्र, ज्या चित्रपटासाठी अभिनेत्रींनी नकार दिला आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे या सीजनबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची क्रेझ बघायला मिळतंय. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हटले जाते.
अमिताभ बच्चन यांनी आता नुकताच मोठे भाष्य केले आहे. काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर हॉट सीटवर हर्षित भूटानी बसले. हर्षित म्हणाला की, इथे बसण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो. अखेर माझे ते स्वप्न आज पुर्ण झाले आहे. हर्षित म्हणाला, माझ्यामध्ये आणि माझ्या पत्नीमध्ये चॅलेज लागले होते की, इथे सर्वात अगोदर कोण पोहोचणार.
हर्षितने आपल्या पत्नीला म्हटले की, बघ तुझ्या अगोदर मी इथे पोहोचलो. हर्षितची पत्नी म्हणाली की, मीच यासाठी तुला ट्रेनिंग दिले आहे. दोघांमधील बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांनी हर्षितला म्हटले की, पत्नीसमोर नेहमीच हार मानली पाहिजे. पत्नीसमोर हार मानली पाहिजे, तीच नेहमी बरोबर असते. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, आतमधील गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण…
आता अमिताभ बच्चन यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरी जया बच्चन याच बॉस आहेत. यापूर्वीही अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी सांगितले आहे. यामुळेच अमिताभ बच्चन हे पत्नीच नेहमी बरोबर असल्याचे म्हणताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन या बिग बॉसच्या घरात पोहोचल्या होत्या.
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन याच्याबद्दल खुलासा करत म्हटले की, नेहमीच घरात काही घडले की, अमिताभ बच्चन हे म्हणतात की, घरात इतकी मोठी घटना झाली आणि तुम्ही लोकांनी मला साधा फोन करूनही काही सांगितले नाही? मात्र, ते हे कधीच बघत नाहीत की, आम्ही त्यांच्या फोनवर किती जास्त फोन केले आहेत. त्यांच्याकडे चार फोन आहेत. मात्र, एकही फोन ते रिसिव्ह करत नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List