ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूर याच्यासोबत मलायका अरोरा हिला ठेवायचे आहे ‘हे’ नाते?, म्हणाली, कितीही…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करताना दिसत आहे. मात्र, पाच वर्षांनंतर यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच विदेशात फिरताना दिसत आहे. अर्जुन कपूरला विसरण्यासाठीच मलायका अधिक वेळ विदेशात घालवत असल्याचे सांगितले जातंय. मलायका अरोरा ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.
मलायका ही सतत इंस्टा स्टोरीवर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. नुकताच मलायका अरोरा हिने एक इंस्टा स्टोरी ठेवलीये. मलायका अरोरा हिने ही इंस्टा स्टोरी अर्जुन कपूर याच्यासाठीच ठेवल्याचे सांगितले जातंय. सतत ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच त्यावर मलायका आणि अर्जुन यांनी भाष्य करणे टाळले आहे.
मलायका अरोरा हिने नुकताच शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माणसाने नेहमीच चांगला माणूस राहिले पाहिजे. निर्दयी लोकांशीही त्याने चांगले वागले पाहिजे. मलायका अरोरा हिची ही पोस्ट पाहून लोकांनी अंदाजा लावला आहे की, मलायका हिने हे सर्व अर्जुन कपूर याच्यासाठीच लिहिले आहे. काहीही झाले तरीही तिला अजून कपूरसोबत चांगलेच वागायचे आहे.

आता मलायका अरोरा हिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टच्या अगोदर तिने इंस्टा स्टोरीवर अजूनही काही फोटो शेअर केले आहेत. मलायका अरोरा हिने शेअर केलेले हे फोटो विदेशातील आहेत. मलायका हिने बिकिनीवरील अत्यंत बोल्ड असे फोटोही काही दिवसांपूर्वीच इंस्टावर शेअर केले होते. त्यामध्ये ती अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत होती.
अनिल कपूर यांनी थेट अर्जुन कपूर याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते की, आता कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर कोणाचे लग्न होणार आहे?. यावर उत्तर देत थेट अनिल कपूर हे म्हणाले की, आता कपूर खानदानामध्ये अर्जुन कपूर याचे लग्न होणार आहे. खरोखरच अर्जुन कपूर हा लग्न करणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List