नराधम शिक्षकाचा 8 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; पीडित मुलीने न घाबरता सांगितली सर्व घटना

नराधम शिक्षकाचा 8 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; पीडित मुलीने न घाबरता सांगितली सर्व घटना

महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच आहे. कोलकाता, बदलापूर, पुणे,… यासारख्या अनेक शहरांमध्ये मुलींना वासनेचे शिकार बनवले जात आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता तामिळनाडूमधून एक मोठी घटना समोर आली आहे. केंद्रीय विद्यालय शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र सोनी असे त्या आरोपीचे नाव आहे. सोनी हा शाळेत कला शिक्षक आहे. आरोपी रामचंद्र हा मुळचा राजस्थानचा आहे. रामचंद्रने शाळेतील एका 8 वी तील मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मात्र या मुलीने न घाबरता याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, शाळा प्रशासनाने तातडीने चौकशी करून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शाळा प्रशासनाने आरोपी शिक्षक रामचंद्र सोनी याला निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;