फोटोमध्ये दिसणारी चिमुकली गडगंज श्रीमंत, कसे कमवले 500 कोटी रुपये?

फोटोमध्ये दिसणारी चिमुकली गडगंज श्रीमंत, कसे कमवले 500 कोटी रुपये?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आता इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री आहेत. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने काही अभिनेत्रींनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ही चिमुकली आहे तरी कोण? फोटो दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. आज दीपिका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

गेल्या 17 वर्षांपासून दीपिका पादुकोण बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीने 17 वर्षांमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सध्या प्रेग्नेंसीमुळे दीपिका हिने ब्रेक घेतला आहे. नुकताच अभिनेत्रीचा ‘कल्की’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. दीपिका पादुकोण हिच्या ‘कल्की’ सिनेमाने जवळपास 3737.5 कोटी रुपयांची कमाई केली.

 

 

सांगायचं झालं तर, दीपिका हिने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. स्वतःच्या मेहनतीवर दीपिका हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. दीपिका हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अनेक माध्यमांमधून अभिनेत्री कोट्यवधींचा माया कमावते.

दीपिका पादुकोण अभिनयाशिवाय स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस देखील संभाळते. अभिनेत्रीच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव ‘का’ प्रॉडक्शन असं आहे. अभिनेत्रीने प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात 2018 मध्ये केली. स्वतःच्या प्रॉडक्शन अंतर्गत अभिनेत्रीने ’83’ आणि ‘छपाक’ सिनेमाची निर्मिती केली आहे.

बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पादुकोण हिचं नाव अव्वल स्थानी आहे. रिपोर्टनुसार, दीपिका हिच्याकडे जवळपास 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दीपिका एका सिनेमासाठी 30 कोटी रुपये मानधन घेते. अभिनेत्री महिन्याला 3 कोटी रुपये कमवते. तर वर्षाला अभिनेत्री 40 कोटी रुपयांची कमाई करते.

सिनेमांशिवाय दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून देखील तगडी कमाई करते. इन्स्टाग्रावर कोणत्याही जाहिरातीसाठी अभिनेत्री तब्बल 1.5 कोटी रुपये मानधन घेते. गेल्या वर्षी, दीपिका पदुकोणने 82°E नावाचे स्किन केअर प्रॉडक्ट लाँच केले होते, जे आता जगभरात प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने 2013 मध्ये ‘ऑल अबाउट यू’ नावाने तिचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. दीपिका हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;