सीताईला मोठं वचन देऊन ‘शिवा’ जिंकेल का त्यांचं मन? मालिका रंजक वळणावर
दहीहंडी विशेष भागानंतर 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो.
पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या, अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा तिच्या शिवाच्या कपड्यांमध्ये दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते.
शिवा सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न करते. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List