ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री प्रायव्हेट आयलँडची मालकीण; 8 वर्षांत हिट सिनेमा नाही तरी दीपिका, प्रियांका, आलिया, कतरिनाला टाकलं मागे

ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री प्रायव्हेट आयलँडची मालकीण; 8 वर्षांत हिट सिनेमा नाही तरी दीपिका, प्रियांका, आलिया, कतरिनाला टाकलं मागे

जमिनीचा छोटा भाग खरेदी करणं अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. स्वत:च्या मालकीची जमीन विकत घेणं हे प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. त्यातही प्रायव्हेट आयलँड (बेट) खरेदी करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली. फक्त गर्भश्रीमंत लोकच स्वत:साठी संपूर्ण बेट खरेदी करू शकतात. बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त तीन सेलिब्रिटींनी प्रायव्हेट आयलँड विकत घेतलं आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने गेल्या आठ वर्षांत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असा चित्रपट दिला नाही, मात्र तरीसुद्धा खासगी बेट खरेदी करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

देशातील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्रीच हे करू शकते, असं अनेकांना वाटलं असेल. ऐश्वर्या राय ही सर्वांत श्रीमंत भारतीय अभिनेत्री आहे, पण तिच्याही मालकीचं प्रायव्हेट बेट नाही. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. पण त्यांच्याही नावे हे बेट नाही. इतकंच काय तर आलिया भट्ट, कतरिना कैफ, समंथा रुथ प्रभू, करीना कपूर यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनीही प्रायव्हेट आयलँड विकत घेतलेलं नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलीन फर्नांडिस आहे. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन ही गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

जॅकलीन सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर नसली तरी दशकापूर्वी तिची खूप क्रेझ होती. तिने ‘मर्डर 2’, ‘हाऊसफुल 2’, ‘रेस 2’, ‘किक’ यांसारखे बॅक-टू-बॅक हिट चित्रपट दिले होते. 2016 मध्ये तिचा शेवटचा हिट चित्रपट ‘हाऊसफुल 3’ प्रदर्शित झाला होता. त्यापूर्वी 2011 ते 2014 पर्यंत ती सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेतली अभिनेत्री होती. 2012 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना तिने हा प्रायव्हेट आयलँड विकत घेतला होता. श्रीलंका या तिच्या मायदेशीच तिने बेट खरेदी केलंय.

रिपोर्ट्सनुसार, जॅकलीनने 2012 मध्ये हा आयलँड खरेदी केला असून तिथे ती आलिशान व्हिला बांधण्याचा विचार करत होती. तिने हे बेट स्वत:साठी विकत घेतलं की कर्मशिअल कारणासाठी हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. पण ‘मर्डर 2’ आणि ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटांच्या यशानंतर तिने हे बेट विकत घेतलं होतं. जॅकलीनने 2009 मध्ये ‘अलादिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याच्या दोन वर्षांनंतर ‘मर्डर 2’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतरच्या पाच वर्षांत तिने पाच हिट चित्रपट दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;