समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!

समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता नाग चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याने गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ 27 ऑगस्टचा असून त्यात नाग चैतन्य फुलांनी सजलेल्या कारमध्ये बसल्याचं पहायला मिळतंय. या कारच्या आजूबाजूला बँड बाजा वाजत असून काही लोक नाचत आहेत. ही नाग चैतन्यच्या लग्नाची वरात असल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

एखादी वरात जशी निघते, त्याप्रमाणेच हा व्हिडीओ असल्याने नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाविषयी जोरदार चर्चा होत आहेत. यावेळी त्याने शेरवानी परिधान केला असून एका आलिशान कारमध्ये तो बसलाय. या कारच्या पुढे बँड बाजा वाजत असून काही लोक डान्स करत आहेत. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं कळतंय. सोभिता आणि नाग चैतन्य यांनी हैदराबादमध्येच साखरपुडा केला होता. या व्हिडीओवर अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यच्या कुटुंबीयांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. नाग चैतन्यच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर त्याचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, असं त्यांनी सांगितलं होतं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाशी असलेल्या नात्यात काही कटुता आली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, समंथा ही नेहमीच त्यांच्यासाठी सुनेसारखी नाही तर मुलीसारखी होती आणि पुढेही असेल. “आमचं नातं कधीच बदलणार नाही. त्यांच्या नात्यात काय घडलं, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी समंथा नेहमीच माझ्या मुलीसारखी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. 8 ऑगस्ट 2024 रोजी नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;