मुख्य आरोपींचे नगरमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन?, फोटो झाले व्हायरल; ठेवीदारांमध्ये संताप

मुख्य आरोपींचे नगरमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन?, फोटो झाले व्हायरल; ठेवीदारांमध्ये संताप

नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य आरोपी आहेत. गांधी कुटुंबातील सर्वच आरोपी अनेक महिन्यांपासून फरार असून, नुकतेच रक्षाबंधन सणानिमित्त सगळे कुटुंबीय एकत्र आले होते. स्व. गांधी यांच्या बंगल्यातच आरोपींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांच्या निक्रिय कारभाराबाबत ठेवीदार संताप व्यक्त करीत आहेत.

नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी रक्षाबंधन साजरे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गांधी यांच्या बंगल्याकडे धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत सगळेच फरार झाल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. एका गंभीर आर्थिक घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने ठेवीदार, बँक बचाव कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या वरदहस्ताने आरोपींना एवढी मोकळीक दिली जात आहे? असा प्रश्न ठेवीदार करीत आहेत.

तब्बल 113 वर्षांची मोठी परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना तत्कालीन संचालक व काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपुष्टात आला. रिझर्व्ह बँकेनेही कारवाई केली. यानंतर घोटाळ्याचा तपास होऊन आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच ठेवीदारांना त्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी लढा सुरू आहे. मात्र, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आरोपी निष्पन्न होऊनही पोलिसांना अद्यापि सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळता आलेल्या नाहीत. दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या परिवारातील मुख्य आरोपी मात्र खुलेआम नगरमध्ये बंगल्यावर येऊन सण साजरे करतात. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. एवढे होऊनही पोलिसांना ते सापडत नाहीत, हे आश्चर्यकारक असल्याचे बँक बचाव कृती समितीने म्हटले आहे.

वास्तविक आतापर्यंत पोलिसांनी या घोटाळ्याचा चांगल्या प्रकारे तपास केला आहे. आरोपी निष्पन्न झाले आहेत. काही भ्रष्ट संचालक, तसेच कर्जबुडव्यांना अटकही झालेली आहे. मात्र, कुठेतरी मध्येच माशी शिंकते आणि तपास रखडतो. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांना न्यायासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;