पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या वामन म्हात्रेंची मिंधे सरकारकडून पाठराखण

पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या वामन म्हात्रेंची मिंधे सरकारकडून पाठराखण

पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. मात्र यावेळी मिंधे सरकारने त्यांची पाठराखण केली. अटकपूर्व जामीन अर्जावर कल्याण सत्र न्यायालयाकडून निर्णय दिला जाईपर्यंत म्हात्रेंवर कुठलीही कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी सरकारी वकिलांनी दिली.

बदलापुरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेशी वामन म्हात्रेंनी असभ्य भाषा वापरली. याप्रकरणी विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हात्रेंनी अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली. कल्याण सत्र न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यापुढे सुनावणी झाली.

सत्र न्यायालय अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेत नाही. तसेच अटकेपासून अंतरिम संरक्षणही देत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंती म्हात्रेंतर्फे अ‍ॅड. विरेश पुरवंत व अ‍ॅड. ऋषिकेश काळे यांनी केली. न्यायमूर्तींनी त्यांच्या युक्तिवादाची दखल घेतली. मात्र म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. अटकपूर्व जामीन अर्जावर कल्याण सत्र न्यायालयच निर्णय देईल, असे न्यायालयाने नमूद केले. याचवेळी म्हात्रेंवर तूर्त कुठलीही कारवाई करणार नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्याची नोंद घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

नेमके प्रकरण काय?

शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही. याचा निषेध करण्यासाठी 20 ऑगस्टला नागरिकांनी आंदोलन केले. त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेला वामन म्हात्रे यांनी, ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,’ असे अर्वाच्य शब्द वापरले. याप्रकरणी म्हात्रेंवर अटकेची टांगती तलवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;