ठरलं! अ‍ॅपलचा इव्हेंट 9 सप्टेंबरला, ऐकलं का? आयफोन-16 सीरिज येतेय

ठरलं! अ‍ॅपलचा इव्हेंट 9 सप्टेंबरला, ऐकलं का? आयफोन-16 सीरिज येतेय

गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन चाहत्यांना अ‍ॅपलच्या इव्हेंटची उत्सुकता होती. अखेर कंपनीने या इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. अ‍ॅपलच्या या इव्हेंटला यंदा ‘इट्स ग्लोटाइम’ नावाची थीम देण्यात आली आहे. हा इव्हेंट अमेरिकेत 9 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्या वेळी हिंदुस्थानात रात्रीचे 10.30 वाजलेले असतील. कंपनी या इव्हेंटमध्ये आपली बहुचर्चित आयफोन-16 सीरिज लाँच करणार आहे. या सीरिजमध्ये आयफोन-16, आयफोन-16 प्लस, आयफोन-16 प्रो आणि आयफोन-16 प्रो मॅक्स हे चार फोन लाँच करणार आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर इव्हेंट पाहता येऊ शकेल.

संभावित किंमत

आयफोन-16 : 799 डॉलर (67,100 रुपये)
आयपह्न-16 प्लस : 899 डॉलर (75,500 रुपये)
आयपह्न-16 प्रो : 1099 डॉलर (92,300 रुपये)
आयपह्न-16 प्रो मॅक्स : 1199 डॉलर (1,00700 रुपये)

आयफोन-16ची संभावित फीचर्स

आयफोन-16मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. आयफोन-16 प्लसमध्ये 6.7 इंचाची स्क्रीन, आयफोन-16 प्रोमध्ये 6.3 इंचाची स्क्रीन तर आयफोन-16 प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाची स्क्रीन दिली जाणार आहे. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसमध्ये 2 एक्स ऑप्टिकल झूम, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;