अनंत अंबानींच्या लग्नाला बोलवलं नाही?, अभिनेत्री कंगणा रणौत म्हणाली मी सहसा अवोइड करते…

अनंत अंबानींच्या लग्नाला बोलवलं नाही?, अभिनेत्री कंगणा रणौत म्हणाली मी सहसा अवोइड करते…

अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा धुमधडाक्यात विवाह संपन्न झाला. या विवाहाला झाडून सारी बॉलीवूड मंडळी जमली होती. परंतू ॲक्टर टर्न खासदार कंगना राणौत ही काही दिसली नाही. याबद्दल आता एका मुलाखती अभिनेत्रीने आपले मन मोकळे केले आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री आणि भाजपाची खासदार तिच्या बिनधास्त स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे, मुकेश अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी याचा ग्रॅंड विवाह सोहळा बीकेसीतील जिओ वर्ल्ड मध्ये रंगला होता. या सोहळ्याला बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतची मंडळी उपस्थित होती. परंतू नुकत्याच खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगना राणौत गैरहजर होत्या. याबद्दल कंगना यांनी मुलाखतीत खरे कारण सांगितले आहे.

सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने मला अनंत अंबानींचा कॉल आला होता आणि तो खूपच चांगला मुलगा आहे.त्याने मला त्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले. परंतू माझ्या घरातच लग्न कार्य होतं. तो दिवस आमच्यासाठी खूपच पवित्र आणि महत्वाचा होता, माझ्या धाकट्या भावाचंच लग्न होते.ती पुढे म्हणाली की… खैर ऐसे भी में अव्होईड करती हूं, जादा फिल्मी शादीयां में जाना …

लग्नाला मोठी मंडळी वऱ्हाडी जमली

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा खूपच गाजला होता. या सोहळ्यात भारतीय पारंपारिक प्रथा, पेहराव आणि पाश्चात पाहुण्यांनी देखील घातलेले पेहराव सर्वांच्या लक्षात आहेत. बॉलीवूडच्या इंडस्ट्रीतील  बिग बि अमिताभ बच्चन, शाहरुख खान, गौरी खान, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण, किम कार्दाशियन आणि अनेक जागतिक सेलिब्रिटींची मांदीयाळी जमली होती. या पाहुण्यांनी नव परिणित दाम्पत्याला आशीर्वाद दिले आणि मोठा गडगंज आहेरही दिला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;